लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात महाराष्ट्राचे कनेक्शन समोर आले आहे. आरोपी जुबैर हंगेरकरने हनी ट्रॅपद्वारे महाराष्ट्रातील दोन महिलांशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतील स्फोटापूर्वी महाराष्ट्रात संशयास्पद हालचालींची माहिती तपास यंत्रणांना मिळाली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.