महापालिका निवडणुका काही दिवसांवर आल्या असून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सर्व पक्षांमध्ये उमेदवारांच्या निवडीसाठी व जागावाटपासाठी जोरदार बैठका सुरू आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.