Sanjay Raut : भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा आहे – संजय राऊतांचा खळबळजनक दावा

निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाण्यात स्वबळावर लढण्याचा भाजपचा मनसुबा असून, 'नमो भारत' बॅनरबाजीने प्रचाराला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजप एकनाथ शिंदे यांचा पराभव करू इच्छितं असा धक्कादायक दावा केला आहे. शिवसेना भवनासमोरच्या बॅनरबाजीवरूनही राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू झाला आहे.