प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! लोकल रेल्वेचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा

वर्षाच्या शेवटच्या रविवारी मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. सकाळी ११ ते दुपारी पावणेचार वाजेपर्यंत चालणाऱ्या या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील फास्ट लोकल सेवा वळवण्यात येणार असून एकूण ३३३ लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत. प्रवाशांना विलंब होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.