फेस स्टिम घेण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का?

Steam Benefits: फेस स्टीम किंवा चेहऱ्याला वाफ देण्याचे अनेक सौंदर्यदायी फायदे आहेत. वाफेमुळे त्वचेची छिद्रे उघडतात, ज्यामुळे छिद्रांमध्ये साचलेली घाण, तेल आणि प्रदूषण सहज बाहेर पडते. यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होण्यास मदत होते. तसेच, वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.