अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की…

बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटे पाच वाजता विकास कामांची पाहणी केली. कडाक्याच्या थंडीत त्यांनी हॉटेल व्यावसायिकाच्या आग्रहास्तव चहाचा आस्वाद घेतला. या भेटीदरम्यान, पवारांनी दुग्ध उत्पादक व्यावसायिक आणि स्थानिक उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपाययोजनांवर विचारमंथन केले.