कल्याण-डोंबिवलीमध्ये जागावाटपावरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. कार्यकर्त्यांकडून युती नको, मैत्रीपूर्ण लढत द्या अशी मागणी होत आहे. चव्हाण हे पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करून त्यांना युतीतच लढण्याच्या सूचना देणार आहेत.