राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. आज प्रचाराचा नारळ फोडताना अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती दिली आहे.