आचार्य चाणक्य यांनी केवळ राजकीय वा प्रशासकीय बाबीच नाहीत. तर जीवनाच्या प्रत्येक पैलूंबाबत मार्गदर्शन केलेले आहे. आजच्या काळात नात्यातील गैरसमज, मत्सर, तुलना सामान्य झाली आहे. अशात चाणक्य निती आपल्याला सांगते की प्रत्येक गोष्ट खरी सांगणे समजदारी नाही. काही बाबी खाजगी चुकीच्या लोकांकडे गेल्या तर सहकार्या ऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे आत्मसन्मान, मानसिक शांती आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी काही सीमा निश्चित करणे गरजेचे असते.