Dombivli News : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, व्हिडीओ कॉलवर बोलत ड्रायव्हिंग… बेदरकार रिक्षाचालकामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ !

डोंबिवलीत एका रिक्षाचालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतले आणि व्हिडिओ कॉलवर बोलत रिक्षा चालवली. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या निष्काळजीपणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरटीओ आणि पोलिसांकडून कारवाई न झाल्याने नागरिक संतप्त असून, कठोर उपाययोजनांची मागणी करत आहेत.