भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवघ्या 24 तासांत मागे घेतला. पक्षाच्या आदेशामुळे हा निर्णय घेतल्याचे कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केले. प्रभाग क्रमांक 3 मधून त्यांनी अर्ज भरला होता. पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्षीय निर्णयाचा आदर केला आहे.