सामनाच्या अग्रलेखातून महायुती सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात गुंडांनी प्रवेश केल्याचा आरोप सामनाने केला. महाराष्ट्रात गुंडांना राजकीय सुगीचे दिवस आले असून, राज्यात गुंडाराज सुरू झाल्याचे यात म्हटले आहे. गृहखात्याच्या निष्क्रियतेमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचेही अग्रलेखात नमूद केले आहे.