Narayan Rane : ठाकरेंना शह देण्यासाठी राणेंची तोफ मुंबईत धडाडणार! कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी

भाजपने आगामी मुंबई मनपासह इतर महापालिका निवडणुकांसाठी कोकणी मतांची जबाबदारी खासदार नारायण राणे यांच्यावर सोपवली आहे. ठाकरे गटाला शह देण्यासाठी राणे प्रचारात उतरणार असून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील कोकणी मतदारांना एकत्रित करण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत.