महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मुंबई महानगरपालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत 49 उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म देण्यात आले आहेत, तर उर्वरित फॉर्म आज दिले जातील. उमेदवारांची यादी गुप्त ठेवण्यात आली असून, शेवटच्या क्षणापर्यंत ही गुप्तता पाळली जाणार आहे.