Shivsena-BJP: सत्तेत मित्र, महापालिकेत शत्रू; पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीच नाही तर या 12 ठिकाणी महायुतीत बिनसलं, राजकारणातील नवीन समीकरणं काय?

Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणुकीत आता मोठी धुमश्चक्री दिसून येत आहे. राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजप-शिवसेना महापालिकेत मात्र आमने-सामने उभे ठाकले आहे. मुंबई आणि इतर काही ठिकाणं वगळता राज्यात 10 महापालिकेत दोन्ही पक्षाचं जागा वाटपावरून चांगलं बिनसलं आहे. काय आहे ती अपडेट?