BMC Election 2026 : ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ, नेमकं घडलं काय?

ठाणे काँग्रेस कार्यालयात आगामी बीएमसी निवडणुकीसाठी एबी फॉर्म वाटपादरम्यान पक्षांतर्गत वाद उफाळला. यावेळी शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याने ठाणे नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या उपस्थितीत फॉर्म वाटप सुरू असताना ही घटना घडली, ज्यामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्ताची गरज भासली.