मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. सूत्रांनुसार, उद्धव ठाकरे गट 165, मनसे 52 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. या जागावाटपात उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व दिसून येत आहे.