सुंदर पिचाई यांच्यापेक्षा पाचपट श्रीमंत आहे ही भारतीय महिला उद्योजक, नेटवर्थ किती पाहा ?

टेक्नॉलॉजीच्या वेगवान जगात जयश्री उल्लाल यांची कहाणी सर्वात स्तिमित करणार आहे. भारतीय मूळ असलेली ही महिला केवळ टेक इंडस्ट्रीची सर्वात प्रभावशाली लीडर नसून तर साल 2025 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये तिने भारतीय वंशाच्या प्रोफेशनल मॅनेजर्समध्ये सर्वात उंचीवर पोहचून सत्य नडेला आणि सुंदर पिचई सारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. जयश्री उल्लाल यांची संपत्ती 5.7 अब्ज डॉलर आहे. अरिस्टा नेटवर्क्सची प्रेसिडेन्ट आणि सीईओच्या रुपात जयश्री यांनी एका छोट्या स्टार्टअप क्लाऊड नेटवर्कींगचे पॉवर हाऊस बनवले.