जालन्यात भाजपच्या माजी आमदारांसमोर तिकीट नाकारल्याने काँग्रेसच्या माजी नगरसेविका संगीता पाचगे यांनी गोंधळ घातला. दुसरीकडे, अमरावतीत भाजपासोबत युती असतानाही रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने ४१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामुळे युतीधर्मावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राज्यातील स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.