Municipal Election 2026 : तिकीट न मिळाल्याने कुठे टीव्ही सेट फोडले, कुठे नेत्यांचे पोस्टर्स फाडली

राज्यात २९ महानगर पालिकेच्या निवडणूकांसाठी नामनिर्देशित पत्र भरण्याच्या शेवटच्या तारखेला सर्व पक्षात गोंधळाची स्थिती होती. तिकीट न मिळालेल्या नाराजांनी कुठे रडारड केली, कुठे आपल्या नेत्यांची पोस्टर्स फाडली. नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यालयातीलच टीव्ही सेट फोडल्याचा प्रकार घडला आङे.