कुणाला स्मशानभूमीत एबी फॉर्म दिला, तर कुणाचं तिकीट कापलं म्हणून उपोषण…शेवटच्या दिवशी रूसवे फुगवे, काय घडलं?

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून तिकीट वाटपामुळे अनेक ठिकाणी गोंधळ, वाद आणि आंदोलने झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांनी अन्नत्याग आंदोलन केले तर नागपुरात स्मशानभूमीत उमेदवाराला तिकीट देण्यात आले. यामुळे राज्यात राजकीय नाट्य आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाले.