Sanjay Raut : पैशांसाठी गुंडांची रिघ.. उमेदवारीसाठी दादांकडे 5 तर शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांच्या आरोपानं खळबळ

संजय राऊत यांनी महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील उमेदवारीबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, अजित पवार गट उमेदवारीसाठी ५ कोटी रुपये घेतो, तर एकनाथ शिंदे गट १० कोटी रुपये घेतो. निष्ठावंतांऐवजी पैशांसाठी गुंडांना उमेदवारी दिली जात असून, निष्ठा पैशांच्या पावसात वाहून गेल्याचे राऊत म्हणाले.