मुंबई महापालिकेत भाजपच्या मंदाकिनी खामकर यांना अर्ज भरण्यात 15 मिनिटांचा उशीर झाल्याने उमेदवारीची संधी हुकली आहे. एबी फॉर्म हातात असूनही वॉर्ड क्रमांक 212 मधून निवडणूक लढवण्याची त्यांची संधी वाया गेली. सुत्रांनुसार, या अल्पशा विलंबामुळे एका भाजप उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले.