Dhule Municipal Polls: धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कुणाची बिनविरोध निवड?

धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने आपले पहिले खाते उघडले आहे. भाजप उमेदवार उज्ज्वला रणजीत राजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकताच राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केलेल्या भोसले यांनी धुळे महानगरपालिकेतून भाजपच्या विजयाची नोंद केली. हा भाजपसाठी एक महत्त्वपूर्ण प्रारंभ मानला जात आहे.