अनुभवी खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, नववर्षापूर्वीच मिळाली वाईट बातमी

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू सिकंदर रजा याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या छोट्या भावाचं वयाच्या 13व्या वर्षी निधन झालं आहे. तो जन्मापासूनच हीमोफीलिया नावाचा दुर्मिळ आजाराने ग्रस्त होता.