Devendra Fadnavis: बंडोबांना थंड करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री मैदानात; त्या फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा, नाराज निष्ठावंताचं बंड शमेल का?

Devendra Fadnavis on Rebel: सरते वर्ष भाजपच्या बंडोबांनी खास गाजवले. निष्ठावंतांचा आक्रोश, टाहोंनी अनेक शहरातील आकाश दणाणून गेले. काहींनी अन्नत्याग सुरु केला. तर काहींनी मंत्रिमहोदयांच्या कारला घेराव घातला. कुणाला भोवळ आली, कुणाला भावनावेग आवरता आला नाही. या सर्व नाराजीची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.