Punes Dagadusheth Ganapati : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. नव्या वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावी या इच्छेने भक्तगण येथे दाखल झाले. जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या, ज्यात प्रत्येक जण श्रद्धेने बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत होता.