मुंबईतील नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात झाले. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलने 2026 या नव्या वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील लोकल गाड्यांनी मध्यरात्री 12 वाजता एकाच वेळी हॉर्न वाजवून नववर्षाचे आगमन साजरे केले.