मुंबई महापालिका निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. वॉर्ड क्रमांक 107 मध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने गटाला लढण्यापूर्वीच जागा गमवावी लागली. यामुळे नील सोमय्या यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. हा शरद पवारांसाठी एक मोठा राजकीय सेटबॅक मानला जात आहे. आता गट अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार का, याकडे लक्ष आहे.