उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने कुटुंबातील सदस्यांना संधी दिली आहे. चार कुटुंबांमधून एकूण १२ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात धनंजय बोराडे, वसुधा बोराडे, शीतल बोराडे, अमर लुंड, कांचन लुंड, युवराज पाटील, मीनाक्षी पाटील, राजेंद्रसिंह भुल्लर, चरणजित कौर भुल्लर आणि विक्की भुल्लर यांचा समावेश आहे.