अहिल्यानगरमध्ये आगामी मनपा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अर्जांच्या छाननीदरम्यान शिंदे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. एकूण ५४ उमेदवारांपैकी पाच अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आव्हाने अधोरेखित झाली आहेत.