Jejuri Khandoba Temple : जेजुरी गडावर भंडारा उधळत नवीन वर्षाचे स्वागत, भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील जेजुरी गडावरील श्री खंडोबा मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. भंडारा उधळत, भक्तीमय वातावरणात भाविकांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. वर्षाची सुरुवात देवाला वंदन करून व्हावी, या इच्छेने अनेक भक्त खंडोबाच्या दर्शनासाठी उपस्थित होते.