अहिल्यानगर पालिका निवडणुकीतील मनसेचे दोन उमेदवार गेल्या 24 तासांपासून बेपत्ता झाले आहेत, त्यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला जात आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हा प्रकार घडल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्षांनी केला आहे. दुसरीकडे, धुळे महानगरपालिकेत भाजपच्या सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे.