नागपूर महापालिका निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार घडला. प्रभाग १३ ड मधील अपक्ष उमेदवार किसन गावडे यांना भाजपच्या निर्देशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निघाले असता, त्यांच्याच समर्थकांनी घरात कोंडून ठेवले. उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून घराला बाहेरून कुलूप लावत समर्थकांनी आंदोलन केले. हा हाय व्होल्टेज ड्रामा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.