बकरी विकून पाकिस्तान सरकारने कमावले 1.5 कोटी रुपये; हे कसं झालं शक्य?
पाकिस्तानने ग्रे गोरलच्या (बकरीची एक प्रजात) ट्रॉफी हंटिंग परमिटला विकून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. खैबर पख्तूनख्वामध्ये एका अमेरिकन नागरिकाने पहिल्यांदाच ग्रे गोरल या प्राण्याची शिकार केली. त्यातून पाकिस्तानला कोट्यवधींचं उत्पन्न मिळालं.