नवीन वर्षाचं स्वागत अनेकांनी मोठ्या थाटात आणि उत्साहात केलं. अनेकांनी मंदिरात जावून देवाचं दर्शन घेत नव्या वर्षाची सुरुवात केली. अनेकांनी शिर्डी येथील मंदिरात साईबाबांचं दर्शन घेत नवीन वर्षाचं स्वागत केलं... तर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबांना हिरेजडीत सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात आलं.