Uddhav Thackeray : …तसा मिंधे लक्षात राहील, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात, थेट सूर्याजी पिसाळशी गद्दारीची तुलना

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सूर्याजी पिसाळवर जसा गद्दारीचा टिळा लागला, तसाच शिंदेंवरही तो लागला असून ते ४०० वर्षे लक्षात राहतील, असे ठाकरे म्हणाले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना लढायचे आहे असे म्हणत विजयाचा विश्वास व्यक्त केला.