Sanjay Raut : ही काय निवडणूक आहे का, मतदारांनी करायचं काय ? निवडणुकीआधीच उमेदवारांचा विजय, संजय राऊत संतापले

मुंबईसह २९ महापालिका निवडणुकीत ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. पैशाचा पाऊस आणि राजकीय दबावामुळे उमेदवारांना माघार घ्यायला लावले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आयोग सरकारचे 'पाळीव मांजर' असल्याची टीका त्यांनी केली.