क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त नायगाव येथील फुलेवाड्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडीने सुरुवात होईल, तर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.