मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलन प्रकरणी फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान विद्यार्थांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलंय. या संदर्भात उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे.