पुढच्या वर्षी मुंबई खड्डेमुक्त होणार; शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की, पुढील वर्षी मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त होईल. मुंबईचे १००% कॉंक्रिटीकरण केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला ग्लोबल फिनटेक हब बनवण्याचे स्वप्न पाहिले असून, महाराष्ट्राला १० लाख कोटींचा निधी मिळाला आहे. मुंबईच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.