ठाकरे बंधूंनी मुंबईसाठीचा वचननामा प्रकाशित केला आहे. यात शासकीय कर्मचाऱ्यांना घरे, महिलांसाठी स्वाभिमान निधी, मासाहेब किचन्स, स्वच्छतागृहे, पाळणाघरे, स्वयंरोजगार निधी आणि मराठी तरुणांसाठी वसतिगृहे यासारख्या अनेक योजनांचा समावेश आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा महापौर मराठीच होणार असे म्हटले आहे.