पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, ठाण्यातील तो व्हिडीओ अत्यंत गंभीर असल्याचं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हंटलय. पोलिस, उमेदवारांना ठाण्यातील शिंदेंच्या घरी घेऊन येताना त्या व्हिडीओमध्ये दिसू्न येत आहे, असा आरोप राऊतांनी केलाय. उमेदवारांना घरातून पकडून, गाडीत टाकून शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणण्यात आलंय. वर्दीची शान न राखता पोलीस हे काम करतात असा आरोप देखील संजय राऊतांनी केलाय.