भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच सेवेत रुजू होणार आहे. सध्या ट्रेन आणि हायड्रोजन प्लांटची चाचणी सुरू असून, २० जानेवारीनंतर ही ट्रेन जिंद-सोनीपत मार्गावर धावेल. या हायड्रोजन ट्रेनचा कमाल वेग ताशी १४० किलोमीटर असणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना वेगवान आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळेल.