Devendra Fadanvis : आमची काँग्रेसशी लढाई पण विलासराव देशमुख.. रविंद्र चव्हाणांच्या विधानावरून काय म्हणाले मुख्यमंत्री ?

रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या वक्तव्याने लातूरमध्ये गदारोळ झाला. तीव्र प्रतिक्रियेनंतर चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधील सभेत विलासराव देशमुखांचा गौरव करत, चव्हाण यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतल्याचे स्पष्ट केले. त्यांनी लातूरसाठी २२९ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह अनेक विकासकामांची घोषणा केली, ज्यामुळे शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेल.