निवडणुकीच्या धामधुमीत मोठं आक्रीत, अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंचा कुणावर आरोप?

Ajit Pawar NCP Office : निवडणुकीच्या धामधुमीत आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. अगदी पातळीसोडून भाषा वापरण्यात येत आहे. काही हिंसक घटनाही समोर आल्या आहेत. सोलापूरात एक खून झाला आहे. तर आता छत्रपती संभाजीनगरमधील कैलासनगरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.