Eknath Shinde : ठाकरेंचा बालेकिल्ला परळ-लालबागमध्ये एकनाथ शिंदे- माजी आमदार दगडू सकपाळ भेट, चर्चा, राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

Eknath Shinde BMC Election 2026 : परळ-लालबाग हा भाग स्थापनेपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. काल एकनाथ शिंदे आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांची भेट झाली. त्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा, तर्क-वितर्कांना ऊत आला आहे. सकपाळ यांची मुलगी ठाकरे गटाकडून महापालिकेचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होती.