पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय जवळीक वाढली आहे. 'राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो' असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.