लिंबू खाल्ल्यानंतर डोळे अचानक बंद का होतात?

अनेकदा तुम्हाला असे वाटले असेल की लिंबू चाटताच तुमचे डोळे अचानक बंद होतात आणि एक वेगळ्याच प्रकारची प्रतिक्रिया येते. लिंबाशिवाय चिंच आणि इतर आंबट पदार्थांवर देखील अशीच प्रतिक्रिया असते. हे का घडते माहीत आहे का? संशोधनात असे दिसून आले आहे की आंबट चव मज्जातंतू आणि मेंदूला असे काही संकेत पाठवते. ज्यामुळे डोळे बंद करण्याची प्रतिक्रिया सक्रिय होते.