बहुतांश वेळेला सर्वांशी फटकून वागणाऱ्या जया बच्चन या बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतात. त्यांचं वागणं, बोलणं , समोरच्याला फटकारणं, पापाराझींवर भडकणं, एवढंच नव्हे तर पापाराझींबद्दल, त्यांच्या कपड्यांबद्दल त्यांनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य यावरून त्यांना टीकेचाही सामना करावा लागला. तर रेखा यांचं फोटोग्राफर्सशी नातं मनमोकळं असतं, त्या हसतमुखाने पोझही देतात.